केजच्या कदमवाडी फाट्यावर कार पुलाला धडकल्याने दोघेजण ठार झाले, सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ
Beed, Beed | Sep 16, 2025 कार पुलाला धडकून घडलेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाल्याची घटना आज मंगळवारी (दि. १६) केज-मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कदमवाडी फाट्यावर घडली आहे. मयतामध्ये परळी येथील बूट, चप्पलचे ठोक विक्रेते इम्रान कच्छी अन् चालकाचा समावेश आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन केज उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. इम्रान इब्राहिम कच्छी (वय ५० वर्ष), चालक अझरुद्दीन बाबामिया शेख (वय ४० वर्ष) दोघे रा. परळी अशी मयतांची नावे आहेत. इम्रान कच्छी यांचा परळी येथे फुटवेअर चा ठोक विक्रीचा व्यवसाय आहे.