मोहोळ: जितेंद्र आव्हाड ओबीसीचा वाघ आहे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके
Mohol, Solapur | Sep 16, 2025 जितेंद्र आव्हाड हा ओबीसीचा वाघ आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. ते सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि आमचे भलेही जुळत नसेल. मात्र, ते ओबीसी आरक्षणावर बोलतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, हळूहळू सर्वजण ओबीसी आरक्षणावर बोलतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.