दि.23 डिसेंबर रोजी आठ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून 1005 नामनिर्देशनपत्रे वितरीत झाली असून आज दि. 24 डिसेंबर 2025 रोजी 603 इतकी नामनिर्देशनपत्रे नेण्यात आली आहेत. यामध्ये बेलापूर विभागातून 52, नेरुळ : 102, वाशी : 90, तुर्भे : 96, कोपरखैरणे : 111, घणसोली : 75, ऐरोली : 47 व दिघा : 30 याप्रमाणे नामनिर्देशनपत्रे वितरण झाले आहे. कोणतेही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. उद्या 25 डिसेंबर रोजी या पूर्वी जाहिर केल्याप्रमाणे नामनिर्देशनपत्र वितरण व दाखल करणे ही प्रक्रिया होणार नाही याची कृपया संबधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.