राज्य शासनाने मान.सर्वोच्च न्यायालयात दि. 23 ऑक्टोबर 2025 अखेर पूनर्विचार याचिका दाखल न केल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांच्या मनात राज्य शासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून आज रविवार दि. 09 नोव्हेंबरला 12 वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.