विदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या कामठी नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या ४० वर्षांपासूनचा वनवास संपवत भाजपचे अजय अग्रवाल यांनी दणदनीत विजय मिळवला असून, कामठीच्या नगरभवनावर अखेर भाजपचा झेंडा फडकला आहे.कामठी नगरपरिषदेची ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.