उदगीर: गोपाळ नगर येथे एकास कत्तीने मारहाण,चौघांवर गुन्हा दाखल
Udgir, Latur | Dec 7, 2025 उदगीर शहरातील गोपाळ नगर भागात एकाच्या घरासमोर मुलाच्या मारहाणीचा जाब विचारणाऱ्या वडीलांच्या कानसुलीत कत्तीने मारुन जखमी केले. याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,५ डिसेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास शहरातील गोपाळ नगर भागात फिर्यादीच्या घरासमोर फीर्यादीने तु माझे मुलास मारहाण का केलास असे विचारणा केली असता आरोपींने व अन्य तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण केली