नागपूर ग्रामीण: नागपुरात अंगणवाडी सेविकांचा एल्गार! BLO च्या कामावर बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
आपल्या मूळ कामाव्यतिरिक्त प्रशासनाकडून लादल्या जाणाऱ्या कामांच्या ओझ्याविरोधात नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बी.एल.ओ. मतदार नोंदणी अधिकारी च्या अतिरिक्त कामामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आज शेकडो अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला.