सातारा: जिल्हा रुग्णालयात तरुणीने दिलेले चारही बाळ सुखरूप, खाकुर्डिया यांच्या घरी आता सात मुलांची किलबिल
Satara, Satara | Sep 15, 2025 साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय महिलेने जिल्हा रुग्णालयात 12 सप्टेंबर रोजी एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे, या चारही बाळांची व आई सुखरूप असून काजल यांनी यापूर्वी जोडी बाळ झाली आहेत तसेच दुसऱ्यांदा बाळंतपणात एक मूल झाले आहेत त्यामुळे गवंडी काम करणाऱ्या खाकुर्डिया यांच्या घरी आता सात मुलांची किलबिल सुरू झाली आहे, दरम्यान जिल्हा रुग्णालयात चारही बाळे व त्यांची आई सुखरूप असल्याचे जिल्हा शल्य चकिस्तक युवराज करपे यांनी सांगितले.