जळगावातील रामेश्वर कॉलनी भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.