परभणी: “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘’छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक
“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘’छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक करण्यात आले. 25 ऑक्टोबर रोजी परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वेचे सूचना देताना छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख करण्यात आला. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड “CPSN” असा असेल. त्यामुळे “औरंगाबाद” रेल्वे स्थानकास आता पुढे “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील. असे रेल्वे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे