चांदूर बाजार: वझ्झर धरणापासून जाणारा रस्ता दुरुस्तीची शिरसगाव सर्कलचे माजी जि प सदस्य सुखदेवराव पवार यांची मागणी
आज दिनांक 7 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजताचे दरम्यान शिरसगाव कसबा जिल्हा परिषद सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार, यांनी वझ्झर धरणापासून धामणगाव कडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करून, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अत्यंत खराब झालेल्या या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे. अनेक दिवसापासून प्रशासनाचे लक्ष नसल्याने हा रस्ता वाहतुकीकरिता धोकादायक असल्याचे सुखदेवराव पवार यांनी सांगितले