उल्हासनगर: उल्हासनगरच्या धोबी घाट येथे फटाके वाजवताना घरावर लागली आग
अनेक वेळा फटाके वाजवताना दिवा लावताना अचानक आग लागते आणि अनेक वेळा जीवित हानी देखील होते त्यामुळे फटाके वाजवताना काळजी घेणे गरजेचे असते. अशीच एक घटना उल्हासनगरच्या धोबी घाट येथे घडली आहे. फटाके वाजवत असताना एक फटका वर गेला आणि घरावर असलेल्या गवतामध्ये फटाका पडल्याने गवताने पेट घेतला. मात्र सकाळची वेळ होती आणि आग लागल्याचे लक्षात आले त्यामुळे तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही,परंतु फटाके वाजवताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.