आई-वडील खालच्या घरात असतांना वरच्या मजल्यावर ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत मोहीत अशोक पाटील (वय २१, रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी ११ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.