उत्तर सोलापूर: महावितरणच्या चुकीच्या पुनर्रचनेविरोधात सोलापुरात वीज कर्मचारी आक्रमक; तीन दिवसांचे आंदोलन सुरू...
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकारी संयुक्त कृती समिती तर्फे सोलापूर सर्कलमध्ये ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२५ रोजी तीन दिवसीय आंदोलन सुरू आहे. महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाविरोधात तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी 12 वाजता हे आंदोलन करण्यात आले आहे. वीज कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.