कोरेगाव: चिकन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांविरोधात सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मर्स आक्रमक; आंदोलनाचा दिला थेट इशारा
चिकन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या सातारा जिल्ह्यातील कार्यालयाकडून संपूर्ण जिल्हाभरातील पोल्ट्री फार्मर्सवर फार मोठा अन्याय केला जात आहे. त्याच्याविरोधात सर्व पोल्ट्री फार्मर्स एकत्रित आले असून त्यांनी छावा पोल्ट्री फार्मर्स सामाजिक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेने कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी येथील सह्याद्री मंगल कार्यालयात मेळावा घेऊन थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत संघटित झालेल्या पोल्ट्री फार्मर्सने सोमवारी सकाळी ११ वाजता दिलेल्या माहितीनुसार,आंदोलनाची भूमिका घेण्यात आली.