वरोरा: परसोडा येथे प्रवासी निवारा उभाराः सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांची आ. करण देवतळे यांच्याकडे मागणी
परसोडा येथील जुना प्रवासी निवारा पाडण्यात आला, मात्र काम पूर्ण होऊनही तो अद्याप पुन्हा उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे गावांतील नागरिक, विद्यार्थी व प्रवासी यांना उन्हात, पावसात रस्त्याच्या कडेला उभं राहून बसची वाट पाहावी लागते. या गंभीर समस्येची दखल घेत परसोडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम शिवशंकर आमने यांनी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना आज दि 17 ऑक्टोबर 3 वाजता निवेदन देत प्रवासी निवारा बांधण्याची विंनती केली आहे.