हिंगोली: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनी तात्काळ ई केवायसी करावी,जिल्हा संपर्क मंत्री मेघनाताई बोर्डीकर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांनी तात्काळ ई केवायसी करून घेण्याचे आवाहन हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क मंत्री तथा राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी आज केले आहे. लाडक्या बहिणींना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये मानधन देण्यात येते तर हे मानधन यापुढे देखील सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनी ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्या अनुषंगाने मेघनाताई बोर्डीकर यांनी लाडक्या बहिणींना आवाहन केले.