उत्तर सोलापूर: कस्तुरबा मार्केट येथे सासूने आणि पतीने महिलेला चप्पलने केली मारहाण, सासूसह पतीवर जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल
पतीने-पत्नीला तू तुझ्या आईच्या घरी जा असे म्हणून वाद घातल्याने पत्नी तिच्या पतीचे मामा यांना सांगण्यासाठी घरी पायी चालत जात असताना पतीने शिवीगाळ करत मारहाण केली.त्यावेळी सासूने देखील सुनेला चप्पलने मारहाण केली व फिर्यादी यांची आई संगीता या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता,त्यांना देखील शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कस्तुरबा मार्केट येथे घडली.