अकोट: ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेचे बक्षीस वितरण सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या हस्ते झाले
Akot, Akola | Oct 15, 2025 अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा 2025 चे बक्षीस वितरण सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुंनगरे यांची मंचावर उपस्थिती होती तर अकोला जिल्हा पोलीस दला तर्फे ग्रामिण पोलिस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतून वडाळी सटवाई प्रथम मुंडगाव द्वितीय रुईखेड तृतीय तर सावरा व पणज येथील गणेश मंडळ हे प्रोत्साहन पर ठरले