अंबरनाथ: बदलापूर पनवेल हायवेवर मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया, हायवे परिसर झाला जलमय
बदलापूर परिसरामध्ये अगोदरच नागरिकांना जेमतेम पाणी मिळत असल्यामुळे नागरिक पाण्याचा काटकसरीने वापर करतात मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. बदलापूर पनवेल हायवे येथील मोहपाडा येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. संपूर्ण हायवे वर पाणी झाल्यामुळे वाहन चालकांना अडथळा निर्माण होत होता, तसेच परिसर जलमय झाला होता. 40 ते 45 मिनिटानंतर पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्यात आले मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते.