वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथे १९९० पासून कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ प्राथमिक उपचारांची सुविधा असून, मध्यम व गंभीर आजारांसाठी रुग्णांना वर्धा, सेवाग्राम किंवा नागपूर येथे जावे लागत आहे. शहराची लोकसंख्या २२ ते २५ हजार असून आजूबाजूच्या २५ ते ३० गावांतील नागरिकही याच केंद्रावर अवलंबून आहेत.लॉजिस्टिक पार्कमुळे भविष्यात लोकसंख्या वाढणार असल्याने सिंदी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्या