धामणगाव रेल्वे: वाठोडा येथे महिलेला काठीने मारहाण ;मंगरूळ दस्तगीर पोलिसात गुन्हा दाखल
वाठोडा येथे राहणारे का 35 वर्षीय महिलेने दामोदर कवटकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे .ग्रामपंचायतच्या नळाच्या पाणी आले सदर महिलेने नळाचे पाणी घराच्या वर असलेल्या टाकी भरण्याकरता मोटर चालू केली तर तिचे सासरे दामोदर यांनी तिला म्हटले तुझ्या बापाच्या घरून लाईट भरायला पैसे आण तू मोटर का लावली? त्यामुळे जास्त बिल येथे असे म्हणून वाद केला व घरात ठेवलेली जनावरे हाकलण्याची काठी हातात आणली व काठीने मारहाण केली ..त्यामुळे महिलेला फॅक्चर झाले अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे.