आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान धर्माबाद येथे उमेदवाराच्या मुलीला झालेल्या मारहाण प्रकरणी योग्य कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.धर्माबाद आज मतदान प्रक्रिया पार पडली.भाजपच्या नागराध्यक्ष पदाचे उमेदवार यांची कन्या जंगमपल्ली गौड हिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. प्रभाग क्रमांक १ मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर कारवाई करणार आल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार धर्माबाद येथे म्हणाले