सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील साळुंके यांना हद्दपार करण्या बाबतचा पारित केलेली उपविभागीय अधिकारी यांचा आदेश विभागीय आयुक्तांकडून रद्द करण्यात आलेला आहे.साळुंके हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना 4 जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले होते दरम्यान या आदेशा विरुद्ध साळुंके यांनी एडवोकेट योगेश जाधव यांच्यामार्फत विभागीय आयुक्त कार्यालय येथे अपील दाखल केली होती दरम्यान एडवोकेट जाधव यांच्याकडून केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर हे आदेश रद्द करण्यात आले.