जिंतूर: येलदरी जलाशयातून दहा दरवाजांद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे सदरील पाणी येलदरी धरणात येत असल्यामुळे आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता धरणाचे सर्व दहा दरवाजे अर्धा मीटर ने उघडले आहेत यातून 23800 क्युसेक्स एवढा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात येत असून येथील जलविद्युत केंद्राच्या तीन संचांमधून 2700 क्यूसेक्स एवढा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने सध्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.