नागपूर ग्रामीण: नागपूर IIIT मधील विद्यार्थ्याची आत्महत्या; प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप
नागपूरमधील IIIT कॅम्पसमध्ये श्रेयस माने या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार निदर्शने केली.श्रेयसच्या आत्महत्येनंतर त्याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि रुग्णवाहिका येण्यासही विलंब झाला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.