भंडारा नगरपरिषद निवडणुकीच्या निकाल प्रक्रियेत प्रभाग क्रमांक ३ मधील ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांचे निकाल प्रदर्शित न झाल्याने निर्माण झालेल्या वादावर आंदोलनाची पुढील रणनीती स्पष्ट करण्यासाठी विश्रामगृह भंडारा येथे महत्त्वपूर्ण बैठक २७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकीत, निवडणूक आयोगाने मुख्य सूत्रधारांना वाचवून केवळ छोट्या कर्मचाऱ