जनावरांना अत्यंत निर्दयतेने आणि दाटीवाटीने वाहनात कोंबून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर वरठी पोलिसांनी धडक कारवाई केली असून, या कारवाईत १६ जनावरांसह एकूण १३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस हवालदार तुमाने यांच्या तक्रारीनुसार, पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप (MH 36 F 3779) आणि टाटा एस (MH 30 AB 1856) या दोन वाहनांमधून म्हैस व रेड्यांची चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, आखूड दोराने बांधून क्रूरपणे वाहतूक केली जात होती. या प्रकरणी वाहन चालक सचिन कुकडे...