शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (जीएमसी) डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत तसेच शैक्षणिक विषयांच्या मंजुरीसंदर्भात अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिगाडे यांनी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता अधिष्ठाता डॉ. सोनुने यांची भेट घेतली. त्यांनी आरोग्यसेवा मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे बाधित होत असल्याचे सांगत ही बाब हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. सोनुने यांनी संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती दिली.