जालना: मनसेकडून मंठा चौफुलीवरील उभारण्यात आलेल्या पुलाची चौकशी करण्याची मागणी
Jalna, Jalna | Jun 2, 2026 जालना शहरातील मंठा चौफुली येथे खासगी कंपनीकडून उभारण्यात आलेल्या सिम्बॉल साईन (Symbol Sign) पुलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी व जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे. मनसेच्या निवेदनानुसार, संबंधित कंपनीने आवश्यक शासकीय परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तसेच इतर आवश्यक मंजुरी घेतल्या आहेत का, याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे पुलाच्या उभारणीसाठी कोणत्या प्राधिकरणाने परवानगी दिली, वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम व