लाखनी: सिकलसेलमुक्त समाजासाठी सर्वांनी एकत्र यावे; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे 'अरुणोदय' अभियानांतर्गत आवाहन
सिकलसेल ॲनिमिया या अनुवांशिक आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेले 'अरुणोदय' अभियान ही काळाची गरज असून, नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केले आहे. सिकलसेल हा प्रामुख्याने आदिवासी आणि वंचित घटकांमध्ये आढळणारा रक्ताचा विकार असून, यावर मात करण्यासाठी प्रभावी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि अचूक उपचार अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.