ठाणे: इलेक्शन कमिशनने स्वतःची यंत्रणा राबवावी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाजसेवक संगम डोंगरे
Thane, Thane | Oct 31, 2025 ठाण्यात मतदार यादीत घोळ झाला असल्याचा आरोप समाजसेवक संगम डोंगरे यांनी केला आहे. संगम डोंगरे यांनी आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 2च्या सुमारास ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधला व माहिती दिली. जादूचे प्रयोग करून इलेक्शन जिंकल्यानंतर लोकशाही जिवंत राहील का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच इलेक्शन कमिशनने स्वतःची यंत्रणा राबवावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.