अचलपूर: बोर्डी येथे जुन्या वादातून युवकावर हल्ला, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
अचलपूर तालुक्यातील बोर्डी गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून युवकावर हल्ला झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. फिर्यादी स्वप्नील रामदासजी गूळदे (वय ३१, धंदा-शेती) हे गावात असताना, आरोपी १ अरविंद गोपालराव इंगळे याने त्यांच्याशी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी आकाश अरविंद इंगळे याने काचेच्या तुकड्याने फिर्यादीवर हल्ला करून त्यांच्या हातावर व पोटावर गंभीर जखमा केल्या. या हल्ल्यात फिर्यादी रक्तबंबाळ झाले. फिर्यादीच्या जबानीवरून व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे अचलपूर पोलिसांनी