वर्धा शहरात पोलीस विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक गणराज जैन यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास रूट मार्च काढण्यात आला. आगामी सन उत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात पार पाडावा या उद्देशाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता.हा रूट मार्च वर्धा शहर पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन बजाज चौक, लक्ष्मीनारायण मंदिर रोड, मार्केट परिसर आणि शहरातील विविध भागातून पार पडला. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.