देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदीर सह शहरातील सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य द्वारे कायदे विषयक जनजागृती
श्री बालाजी फरस सह शहरातील सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य द्वारे कायदेविषयक जनजागृती देऊळगाव राजा -दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते ३ वाजे दरम्यान शहरातील ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर फरस परिसर व बस स्थानक परिसर आणि विविध सार्वजनिक ठिकाणी फलक व पथनाट्याद्वारे कायदेविषयक जनजागृती अभियान राबविण्यात आला .देऊळगाव राजा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ तसेच पोलीस विभाग देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमानाने पथनाट्यद्वारे कायदेविषयक जनजागृती अभियान शहरातील विविध भागात राबविण्यात आले .