पातुर: पातुर बाळापूर विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या हातरुण गावात चार्जिंगवरील गाडीला भीषण आग; मोठा अनर्थ टळला.
Patur, Akola | Nov 26, 2025 पातुर बाळापूर विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या हातरूण गावात चार्जिंगवर ठेवलेल्या गाडीला मध्यरात्री भीषण आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली. काजी शाह खालिद खान यांनी एक वर्षांपूर्वी घेतलेल्या हिंदुस्तान पावर कंपनीच्या गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते. रात्री तीनच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने काजी मेहंदी हसन यांच्या लक्षात येताच त्यांनी भावासह पुतण्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने जवळ मवेशी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.