अंजनगाव सुर्जी: तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेतर्फे “फडणवीस पॅकेजची होळी”
राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले ३१,६२८ कोटी रुपयांचे शेतकरी मदत पॅकेज हे केवळ आकड्यांची जादू असून, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे,असा आरोप अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेने केला आहे.या निषेधार्थ आज (१६ ऑक्टोबर) दुपारी १:३० वाजता तहसील कार्यालयासमोर “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पॅकेजची होळी” करून संतप्त आंदोलन करण्यात आले.