पालघर: तारापूर औद्योगिक क्षेत्र वाढते प्रदूषण,एमपीसीबीच्या निषेधार्थ एमपीसीबी कार्यालय येथे तरुणांनी श्राद्ध घालत केले आंदोलन
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ तरुणांनी एमपीसीबी कार्यालय येथे श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले. औद्योगिक क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला असून सर्वपित्री अमावस्येच्या मुहूर्तावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्राद्ध घालत अनोख्या पद्धतीने तरुणांनी निषेध व्यक्त केला.