आष्टी: मतदार संघात पुरातून बाहेर सुरक्षित काढलेल्या नागरिकांना आमदार सुरेश धस यांनी धीर दिला
Ashti, Beed | Sep 15, 2025 आष्टी मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. अचानक आलेल्या या महापुरामुळे अनेक गावांतील घरे पाण्याखाली गेली तर शेकडो नागरिक महिला-पुरुष, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक घरांमध्ये अडकून पडले होते. या वेळी आमदार सुरेश धस यांनी तत्परता दाखवत तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले होते तसेच सुरक्षित काढलेल्या नागरिकांना आमदार धस यांनी धीर दिला.