हवेली: लोणी काळभोरमध्ये गुंडाची मग्रूरी, मध्यरात्री रस्ता आडवून बर्थडे सेलिब्रेशन, 13 जणांना अटक तर तीन फरार
नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटने, कोयत्याने वार करणे, परिसरात दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गुंडाची मग्रूरी वाढली असून त्याचा वाढदिवस चक्क रस्ता अडवून रस्त्यावरच केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.18) मध्यरात्री उघडकीस आला आहे.