जालना: जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दावलवाडी परिसरात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झ
Jalna, Jalna | Jun 7, 2026 जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दावलवाडी परिसरात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवार दि. 7 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने येणार्या कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शनिवारी सकाळी सुमारे 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान दावलवाडी फाटा परिसरात ही घटना घडली. सचिन आठवले (रा. देवपिंपळगाव) असे तरुणाचे नाव आहे.