शपथग्रहणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष विद्या आत्राम यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती दिली. नागरिकांचे आरोग्य, शुद्ध पाणीपुरवठा, शिक्षण व्यवस्था व स्वच्छता या मूलभूत बाबींवर नगर परिषद विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.