अकोला: राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस १ ऑक्टोबरला
रक्तदान मोहिम लोकचळवळ बनवावी – जिल्हाधिकारी वर्षा मीना
Akola, Akola | Sep 15, 2025 रक्तदान हे सर्वात मोठे राष्ट्रीय सेवा कार्य असल्याचे सांगत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अकोला जिल्ह्यातील नागरिकांना स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे ‘राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस’ दरवर्षी १ ऑक्टोबरला साजरा केला जातो. यावर्षी या दिनाचे घोषवाक्य आहे, रक्तदान करूया, आशा जागवूया, एकत्रित येऊन जीवन वाचवूया. या पार्श्वभूमीवर इंडियन रेडक्रॉस सोसायटी, अकोला जिल्हा शाखेतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान रक्तदान प