धुळे सोलापूर महामार्गावर तेरखेडा जवळ चालत्या ट्रकवर चढुन चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Dharashiv, Dharavshiv | Sep 10, 2025
धुळे सोलापूर महामार्गावर तेरखेडा जवळ चालत्या ट्रक मध्ये चोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हवेवर लूट करणाऱ्या या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दुसऱ्या चोरीच्या तयारीत असताना एका गाडीत बसून झोपलेल्या सहा जणांना धाराशिव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेले साहित्य तसेच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. काही गुन्ह्याबाबत त्यांनी कबुली दिल्याचं प्रभारी पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी दि.१० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिली आहे.