जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ज्यूनिअर ज्युदो स्पर्धाचे आयोजन; पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव जिल्ह्यातील हौशी ज्यूदो खेळाडूंसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि उत्साहाची पर्वणी ठरणाऱ्या ५२ व्या राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ ते २ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे अशी माहिती आयोजक माजी महापौर विष्णू भंगाळे, महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक आणि सचिव दत्ता आफळे यांनी शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पत्रकार परिषदेत दिली आहे.