अकोला: अमोल मिटकरींचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत,“मी वैयक्तिकरित्या समाधानी”- मिटकरींची प्रतिक्रिया
Akola, Akola | Nov 13, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रवक्त्यांच्या पहिल्या यादीत आमदार अमोल मिटकरी यांचं नाव नसल्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पक्षातील त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते.मात्र आज पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अमोल मिटकरी यांचं नाव २२व्या क्रमांकावर जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे मिटकरी पुन्हा एकदा आता पक्ष बळकट करणार आहे