जालना: जालन्यात 41 अंश तापमान; जनावरांची धाव तलावाकडे; मुक्तेश्वर तलावात म्हशींचा उन्हापासून बचाव
Jalna, Jalna | Apr 25, 2026 जालना शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे केवळ नागरिकच नव्हे तर मुक्या जनावरांनाही त्रास सहन करावा लागत असून त्यातून बचाव करण्यासाठी जनावरे पाण्याचा आधार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शनिवार दि. 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुक्तेश्वर तलावात जनावरं पाण्यात बसून संरक्षण मिळवित आहेत. शहरातील मुक्तेश्वर तलाव येथे मोठ्या संख्येने म्हशी आणि इतर जनावरे पाण्यात उतरून थंडावा मिळवतात.