जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला शहरातील एका शाळेच्या परिसरातून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. या संदर्भात गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.