पनवेल: आरोग्य जनजागृती उपक्रमांना गती देणार – आरोग्य सेवा संचालक डॉ.विजय कंदेवाड
Panvel, Raigad | Nov 12, 2025 विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांचा प्रभावी प्रसार करून त्या अधिकाअधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी आर.डी. संकपाळ यांनी यात सहभाग घेतला. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. भगवान पवार उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तसेच सहाय्यक संचालक डॉ. संजय कुमार जठार बैठकीला उपस्थित होते.