वर्धा: गोपाळरत्न पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित:पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय जिल्हा उपआयुक्त डॉ. जगदीश बुकतरे
Wardha, Wardha | Sep 19, 2025 भारत सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत गायी-म्हशींचे संवर्धन, दुग्धोत्पादन वाढविणे तसेच डेअरी सहकारी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय गोपाळरत्न पुरस्कार देण्यात येतो. सन 2025 साठी देण्यात येणा-या गोपाळरत्न पुरस्कारासाठी दुग्ध उत्पादन क्षेत्रात काम करणा-या शेतकरी व संस्थांकडून 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.